मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड च्या उपासंका द्वारे 31 ऍम्ब्युलन्सचे दान

कोरोना च्या संकटा मधे *थाईलैंड चे पूजनीय भंते अजाहन जयासारो* आणि *त्यांचे थाई बौद्ध धम्म उपासकांनी, *Dr.हर्षदीप कांबळे (IAS) आणि रोजाना कांबळे* यांच्या सहकार्याने भारता मधे *31 रुग्णवाहिका* चे दान दिले आहे | आज *पुण्यामधे टाटा मोटर्स* या ठिकाणी रुग्णवाहिकांचे भिक्षु संघाच्या उपस्थिती मधे लोकार्पण करण्यात आले | या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाला थाईलैंड चे कॉन्स्युलेट जनरल *श्री सिरिकुल* हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते |
*भगवान बुद्ध* उपदेश देतांना सांगतात जो *प्रतित्यसमुत्पादाला* जाणतो तो धम्माला जाणतो अर्थात हे *जग एकमेकांवर निर्भर आहे*. भगवान बुद्ध दानपारमितेला अत्यधिक महत्व देतात,ही शिकवण अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे |
भारतामधे जेव्हा कोरोना ची दूसरी लाट उंचीवर होती तेव्हा दुःख, वेदना आणि चिंतेने ग्रस्त भारतीयांसाठी थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी मदती चा हाथ दिला |
*संवेदनशीलता, दानपारमिता, मैत्रीभावना, समर्पण आणि महाकरुणा या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप* दोन्ही देशांचा दुवा ठरला |
*मैत्री थाई प्रोजेक्ट* च्या माध्यमातून थाईलैंड मधील *थेरवादा फ़ॉरेस्ट ट्रेडिशन चे परमपूजनीय भंते अजान जयासारो* यांच्या आव्हाना नुसार थाईलैंड च्या बौद्ध उपासक़ांनी भारतीय जनतेसाठी बुद्धांनी संगितलेल्या दानभावने नुसार 31 Ambulance * ची बहुमोल अशी मदत केली आहे |
महाराष्ट्रा चे Industry Commissioner हर्षदीप कांबळे यांच्या माध्यमातून ही सर्व मेडिकल सहायता भारताला प्राप्त झाली | त्यापैकी *Oxygen Concentrator आणि Ventilator* चे यापूर्वी वितरण झालेले आहे तर *31 Ambulance चा लोकार्पण समारोह आज पुण्या मधे पार पडला* |
*बोधगया, सारनाथ, राजगीर, कुशीनगर, लेह-लद्दाख़ या बौद्ध स्थला सह नागपुर,औरंगाबाद, बंगलोर, दिल्ली सह भारता मधील 31 ज़िल्हया मधे या Ambulance चे दान दिले जाईल*
या दाम्पत्याचे मनापासून स्वागत आणि मंगलकामना आणि पूजनीय भंते *अजान जयासारो* ज्यांच्या निर्देशाने हे सर्व शक्य झाले त्यांचे आणि Thailand च्या *बौद्ध उपासकांचे* समस्त भारतीय जनते च्या वतीने आभार आणि साधुवाद |
*भवतु सब्ब मंगलम |*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *