Loading Events

« All Events

  • This event has passed.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मराठी शुभेच्छा

May 16 @ 12:30 am - 11:30 pm

यंदा 16 मे रोजी बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांची जयंती साजरी केली जाणार आहे, हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून सुद्धा ओळखला जातो. बुद्धांचे विचार अंगीकारून  त्यांच्या स्मृतीस मनापासून वंदन करण्यासाठी हा दिवस एक सुरुवात ठरू शकतो. दरवर्षी यानिमित्त मोठे सोहळे पार पडतात .

इ.स.पू. 563 मध्ये लुंबिनी येथे एका राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. त्यांचा सांभाळ करणाऱ्या मावशीच्या अनाव्रुन त्यांना गौतम म्ह्णूनही ओळखले जात होते. पुढे ज्ञानप्राप्तीसाठी गृहत्याग केला ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांना बुद्ध ही पदवी देण्यात आली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापन आणि प्रसार केला आज भारताशिवाय जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी ‘बौद्ध पौर्णिमा’ साजरी केली जाते.

भगवान बुद्धांनी जगाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्यांनी लोकांच्या दु:खांची कारणं सांगून त्या दु:खांचं निवारण देखील सांगितलं. बिहारच्या बोधगयामध्ये बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच कुशीनगरमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. भगवान बुद्धांना भगवान विष्णूचा नववा अवतार देखील मानलं जातं. यामुळं साजरी होते बुद्ध पौर्णिमा जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

14 ऑक्टोबर 1956 रोजी वली सिन्हा, रेवारामजी कवाडे आणि पत्नी माईसाहेब यांच्यासह महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून धम्म दीक्षा – बौद्ध धर्म स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बुद्धं शरणं गच्छामि | धम्मं शरणं गच्छामि | संघं शरणं गच्छामि – बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Details

Date:
May 16
Time:
12:30 am - 11:30 pm