बुद्धाच्या मनात प्रत्येकाबद्दल अपार करुणा असते!

#बुद्ध कुणाची वाहवा करत नाही,
#बुद्ध कुणाचा अपमानही करत नाही…
पण तो तठस्थपणे *चिकित्सा* मात्र करतो.
#बुद्ध आशीर्वाद देत नाही,
#बुद्ध शाप आणि उ:शापही देत नाही…
पण तो तुम्हाला ‘माणूस’ म्हणून कसं जगावं हे सांगणारा *पथदर्शक* मात्र होतो.
#बुद्ध मानला तर भिक्षा मागून जगणारा एक भिक्खु आहे…
आणि जाणला तर स्वत:मध्ये एक प्रचंड *विद्वत्ता* आहे, *अद्वितीय तत्वज्ञान* आहे.
#बुध्द अल्प नाही,
#बुद्ध अती ही नाही…
या कमी आणि जास्तच्या मधल्या पुलावरून तो *सहज चालणारा* आहे.
#बुद्ध कधी सूक्ष्म अणु आहे आणि जवळ गेल्यावर *अवकाशासारखा* आहे…
ज्याचा थांग आपल्याला लागत नाही.
#बुद्ध मानला तर धम्माचा संस्थापक आहे, श्रमण आहे, *तथागत सम्यक संबुद्ध* आहे.. त्याचवेळी बालपण, तारुण्य, वृद्धावस्था, आजारपण आणि मृत्यू या सगळ्या मानवी अवस्थांतून गेलेला तूमच्या-माझ्यासारखा *मानव* सुद्धा आहे.
#बुद्ध शाश्वत सत्य आहे आणि इतक्या आघातानंतर सुद्धा न संपणारी *अभेद्य विचारधारा* आहे.
#बुद्ध एका जागी एक महामानव आहे, आणि दुसऱ्या जागी तो तुमचंच *मन* आहे.
एकदा स्वत:ला विचारा यात तुमचा आणि तुम्हाला समजलेला #बुद्ध‘ कुठे बसतो??
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?